प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे व व्यापारी आणि घरगुती वीज ग्राहकांचे अवास्तव विज बिल कमी करून रीडिंग प्रमाणे बिल आकारावे या न्याय्य मागणीसाठी बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशावरून महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य रमेश पोकळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपा तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर, विजयकुमार पालसिंगणकर, राजेंद्र बांगर, विक्रांत हजारी, चंद्रकांत फड, सुभाष धस,सलीम जहांगिर, डॉ. लक्ष्मण जाधव, भगीरथ बियाणी, प्रा.सचिन उबाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मीरा गांधले, अॅड.संगीता धसे, संध्या राजपूत, भूषण पवार, विलास बामणे, अमोल वडतीले, दत्ता परळकर, फारुख भाई, शरद झोडगे, गणेश पुजारी, छाया मिसाळ, लता मस्के, संजीवनी राऊत, सुशांत घोळवे, गणेश बहिरवाल संभाजी सुर्वे राकेश बिराजदार कल्याण पवार ,बंडू मस्के,न भीमराव मस्के, नितीन आमटे,संपत कोठुळे, प्रल्हादराव धनगुडे, महेश सावंत, शरद बडगे, सुरेश माने, गणेश तोडेकर बाबा गव्हाणे, स्वप्नील शिंदे, आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
