मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला.
लॉकडाऊनला लोकं कंटाळलेत, मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळेल, तुम्ही काहीतरी लपवत आहेत, असे प्रश्न संजय राऊत यांनी टीझरमधून विचारलेले दिसतात. दरम्यान मुख्यमंत्री म्हणतात, मी डोनाल्ड ट्रम्प नाही, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या माणसांना तळमळतांना पाहू. लॉकडाऊन सुरूच असून थोड्याफार सवलती देण्यात आल्या आहेत.
ही मुलाखत 25, 26 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. यापूर्वी मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली. ऊध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले, असे संजय राऊत म्हटले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या देशात कोविड -19 साथीच्या रोगाचा प्रभावी सामना करण्यासाठी टीकेचा सामना करावा लागला आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत कोरोना विषाणूवर कडक निर्बंध लादणे टाळले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउन बंदीच्या बाबतीत सवलती देण्यास सतर्क आहेत.