मराठा मोर्चाचे बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन ; गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविणार

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण

वाचा बदललेला मार्ग 

नेवासा : मराठा मोर्चाचे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली या घटनेला गुरुवारी दोन वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने उद्या मराठा मोर्चाचे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्याची शक्यता असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद-पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय अहमदनगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घेतला आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. सदरील आदेश शासकीय वाहने अंबुलन्स व आपत्कालीन वाहने यांना लागू राहणार नाही.
अहमदनगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मार्ग
(अहमदनगर-नेवासाफाटा-कुकाणा-शेवंगाव-पैठण-बिडकीन-मार्गे औरंगाबाद.)
(अहमदनगर-घोडेगाव – कुकाना – शेवंगाव -पैठण -बिडकीन- मार्गे औरंगाबाद)
औरंगाबादकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मार्ग

(औरंगाबाद- बिडकीन- पैठण- शेवगाव- मिरी- पांढरीपुलमार्गे- अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here