मनसे नगरसेवक अपहरण प्रकरण
तब्बल एक वर्षांनी घेतले गुन्ह्यात नाव
प्रवीण ताटू । राष्ट्र सह्याद्री
शिर्डी: “आजवर आयुष्यात समाजसेवा व साईसेवेचे व्रत घेत प्रामाणिकपणे शिर्डीत राजकारण करत असताना राजकारणातील काही तथाकथित समाजकंटकांनी आपल्याला बदनाम करण्यासाठीच अपहरणन नाट्याचा बनाव घडवुन आणण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायदेवतेवर आपला पुर्ण विश्वास असुन अपहरणाचे नाट्य घडवून आणणा-यांचा खरा मुखवटा न्यायालयाच्या माध्यमातून लवकरच समाजासमोर नक्कीच येईल” असा विश्वास साईनिर्माण गृपचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष विजय कोते यांनी व्यक्त केला.

मनसेचे नगरसेवक दत्तू कोते यांच्या अपहरण प्रकरणी तब्बल एका वर्षानंतर साईभक्त विजय कोते यांना आरोपी करण्यात करण्यात आल्यानंतर कोते यांनी स्वत: हुन लोणी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. दरम्यान, तब्येतीच्या कारणास्तव कोते यांना लोणी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आज राहाता येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोते यांची जामीनावर मुक्तता केली. विजय कोते यांची जामीनावर मुक्तता होताच शिर्डीतील व परिसरातील कोते यांच्या चहात्यांनी मोठा जल्लोश केला.
न्यायालयाच्या बाहेर आल्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विजय कोते यांचेशी संवाद साधला. ते म्हणाले, “वर्षभरापुर्वी शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडनुकीच्या दरम्यान आर्थिक लालचेपोटी अपहरणाचे नाट्य घडवून आणले गेले. या अपहरन नाट्याशी आपला काडीमात्र व दुरान्वयानेही संबंध नसताना आणी पुन्हा नगराध्यक्ष निवडीच्या चर्चेच्या काळात आपले नाव या प्रकरणात जाणीवपुर्वक गोवण्याचा निंदनीय प्रकार झाला. शिर्डीतील नगराध्यक्ष पदाची स्वप्न पहारा-यांनी या नाट्यास खतपाणी घालण्याचा दुदैवी प्रयत्न केला. याचेच मला मला दुख: होत आहे.
आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील,प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत समाजकारणाबरोबर साईसेवेचे काम यापुढेही अखंड सुरूच ठेवणार आहे .आजवर जीवनात द्वेशाचे राजकारणाला कधीही थारा दिला नाही. साईबाबांचे आशिर्वाद आणी न्यायदेवतेवर आपला पुर्णपणे विश्वास असल्याने सत्य जनतेसमोर येणार आहे. दोन दिवसात शिर्डी आणी परिसरातील हजारो कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराने आपल्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी ठाम उभे राहीले याबद्दल कोते यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले.
OnePlus Buds Z (Gray)
₹ 2,799.00 (as of January 20, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Redmi Note 9 Pro Max (Interstellar Black, 6GB RAM, 128GB Storage) - 64MP Quad Camera & Latest 8nm Snapdragon 720G & Alexa Hands-Free | Extra Upto INR 2000 Off on Exchange | Upto 12 Months No Cost EMI
₹ 17,499.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)
राहाता न्यायालयात जामीन झाल्यानंतर विजय कोते यांच्या जल्लोषाच्या घोषणांनी संपुर्ण न्यायालयाबाहेरील परिसर दणाणून गेला होता. न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर कोते यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या मंदीराच्या कळसाचे दर्शन घेतले. साईनिर्माणच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्य स्वागत केले. दुपारनंतर शिर्डी येथील निवासस्थानी परिसरातील चाहत्यांनी मोठी गर्दी केली.