Shrigonda : काष्टी याठिकाणी बिअर बार परमिट रूम फोडले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी याठिकाणी न्यू समाधान परमिट रूम बियर बार नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी याठिकाणी गावाच्या मध्यभागी न्यू समाधान परमिट रूम बियर बार नावाचे दारूचे दुकान आहे. या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री आतमध्ये प्रवेश करून दुकानातील देशी-विदेशी मद्य चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे. तसेच घटनास्थळी अंगुलीमुद्रा तज्ज्ञ ही दाखल झाले आहेत. त्यांनी विविध ठिकाणचे ठसे घेतले असून त्याची पडताळणी सुरु आहे. यानंतर काही वेळातच श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीगोंदा पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here