Shrigonda : चिमुकल्या मुला-मुलींसह आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात असूनही आत्या मामा मात्र निगेटिव्ह

0

ग्राम सुरक्षा समितीच्या सतर्कतेमुळे बेलवंडीगावची कोरोना संक्रमणावर मात; संस्थात्मक विलगीकरण अतिशय महत्त्वाचे

उक्कडगाव | प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

तालुक्यातील बेलवंडी येथील डी. वाय. आठ चारी परिसरातील एक कुटुंब आपल्या बहीण व मेहुण्यासह उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायानिमित्त काही दिवसापूर्वी सुरत या ठिकाणी गेले. सुरतला गेल्यानंतर ते भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले. दरम्यान, या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने त्याने आपले दोन मुले आत्या व मामा समवेत मूळ गावी बेलवंडी याठिकाणी पाठवून दिले.

सुरतवरून येताना त्यांनी ग्रामसुरक्षा समितीशी संपर्क साधला. ग्राम सुरक्षा समिती व बेलवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता दर्शवत सुरतवरून येणाऱ्या या दोन मुलांना आत्या मामा सहित येता क्षणी सर्व नियमांचे पालन करत गावातील मूळ घरी जाऊ न देता थेट गावातील मुख्य संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले.  त्यांचे स्राव घेऊन तातडीने तपासणीसाठी पाठवले.

त्या दरम्यान या कुटुंब प्रमुखाला जास्त त्रास होऊ लागल्याने व कोरोना लक्षणे दिसू लागल्याने तो आपल्या पत्नीसह सुरत वरून आपल्या मूळ गावी बेलवंडीला यायला निघाला. ही माहिती बेलवंडी ग्रामसुरक्षा समितीला समजतात त्यांनी सतर्कता दर्शवत त्या पती-पत्नीला खबरदारीचा उपाय म्हणून गावात येऊ न देता उपचारासाठी श्रीगोंदा येथील कोविड सेंटरला पाठवले. आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये ही दोन चिमुकली मुले पॉझिटिव्ह आढळून आली. तर आत्या मामा संपर्कात असतानाही निगेटिव्ह आले. आत्ताच्या घडीला मुलांचे वडील नगर येथे उपचार घेत आहेत. तर दोन्ही मुले व आई वडील श्रीगोंदा येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर आत्या मामा बेलवंडी येथील विलगीकरण कक्षात आहेत.

बेलवंडी गावची ग्राम सुरक्षा समिती                   

ग्रामपंचायतीचे  पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलवंडी चे पदाधिकारी हे सर्वच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळेच या कोरोना रुग्णांचा गावात कोणासमवेत संपर्क आला नाही व संक्रमणाचा मोठा धोका टळला. प्रत्येक गावात अशी खबरदारी घेतली तर कोरोना संक्रमणाला आळा बसणारच कारण गावातील कोरोना संक्रमण हे बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेच होत आहे. आजही खेड्यातील स्थानिक नागरिक कोरोना संक्रमणापासून दूरच आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here