#Agriculture: Shrirampur : केंद्र सरकारने मका खरेदीला अखेर ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

0
‘राष्ट्र’ सह्याद्रीच्या पाठपुराव्याला अखेर यश; मागिल ‘आठ’ दिवसापूर्वीच राष्ट्र सह्याद्रीने वृत्त प्रकाशित केले होते
 
प्रतिनिधी | भारत थोरात | राष्ट्र सह्याद्री

केंद्र सरकारने मका खरेदीला अखेर 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्र सह्याद्रीच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्र सह्याद्रीच्या बातम्यांचा हा सकारात्मक परिणाम आहे. या निर्णयामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेलापूर येथे जून महिन्यापूर्वीच मका हमी नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. नोंदणी केलेल्या ६८ शेतकर्‍यांची मका खरेदी करण्यात आली होती. २१८ पैकीच १०० शेतकर्‍यांची मका खरेदीच्या प्रतीक्षेत असतानाच १५ जुलै खरेदीची शेवटची मुदत असताना खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. याच कालावधीत कोरोना प्रादुर्भावमुळे बेलापूरगाव लाॅकडाऊन करण्यात आले होते. लाॅकडाऊन असताना पाच दिवस मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. याबाबत ‘राष्ट्र’ सह्याद्रीने ‘मका खरेदी केद्र मुदत संपल्या अधीच बंद शेतकरी आले अडचणीत ‘ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते तेव्हापासून शेतकऱ्याचा व माध्यम प्रतिनिधीचा पाठपुरावा सुरू होता. यांच्यासह अखेर राष्ट्र सह्याद्रीच्या पाठपुराव्याला यश आले. या अनुषंगाने (दि.२२) रोजी मका खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे संबधित शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केद्र सरकारने ३१ जुलै पर्यंत मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. १४ जुलै आधीच मका हमी केंद्र बंद केल्यामुळे शेतकर्‍यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याकडे धाव घेतली होती. भाजपचे चित्ते यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी कृषी मंत्र्यांकडे केली होती मका खरेदी एक हजार ते चौदाशे रूपये क्विंटल दराप्रमाणे खरेदी व्यापा-याकडून केली जात आहे. किमान दराप्रमाणेच पाचशे रू कमी मिळत आहेत. शासकीय हमीभाव केंद्रामुळे एक सातशे पन्नास रू भाव सध्या सुरू आहे. बेलापूर केद्रांत १०० शेतकर्‍यांची खरेदी बाकी असून खाजगी क्षेत्रातील संस्थेकडून केंद्र सरकार मका खरेदी करत आहे. मका ठेवण्यासाठी उपलब्धता जागा नसल्यामुळे खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
अद्यापपर्यंत आठ दिवस उलटूनही मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने ३१ जुलैपर्यंत मका खरेदी केंद्राला मुदतवाढ दिली आहे. भाजपचे प्रकाश चित्ते प्रकाश थोरात नानासाहेब थोरात आदीसह शेतकर्‍यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांची भेट घेत चर्चा केली होती. याबाबतच शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी देखील तहसीलदार पाटील यांना निवेदन देऊन मका खरेदी केंद्राची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.
३१ जुलैपर्यंत केंद्र सरकारने मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. तसा काही आदेश मिळालेला नाही शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार केद्र सरकारचा आदेश येताच मका खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी केली जाईल इतर नवीन नोंदणी केली जाणार नाहीत. 
–   श्रीकांत आभाळे / मका फेडरेशन अभियंता, नगर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here