Beed : शहरातील ‘हे’ सात भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड शहरातील विविध सात ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे या सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
या बाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे . 
बीड शहरात या विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरातील विप्रनगर,  सावता माळी चौक, माळी गल्ली,  शाहूनगर,  क्रांती नगर, सैय्यद नगर ( पांगरी रोड),  कुंभारवाडा या भागातील काही परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे. तसेच या काही ठिकाणी अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात येऊन पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.
राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here