Shevgaon : ढोर नदीवरील बंधारा ओव्हर फ्लो; मोरीच्या फळ्या बनल्या धोकादायक

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव शेवगांव तालुक्यातील बुधवारी रात्री झालेल्या पावसाने ढोरानदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झाला असून बंधाऱ्याला टाकण्यात आलेल्या फळ्यामुळे अति पावसाने पूरसदृश्य परीस्थिती निर्माण झाली तर नदीची दिशा बदलून आर्थिक, मनुष्य पशू हानी होण्याचा धोका संबधित अधिका-याच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाला आहे.

यावर्षी सुरुवातीपासून सर्व नक्षञात चांगला पाऊस पडत असून मगील सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसानंतर बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी मो-यांना फळ्या टाकण्यात आल्या ख-या. मात्र, पाऊसाळा सुरु होऊन दोन महिने उलटून गेले तरी बंधाऱ्यावरील फळ्या काढण्यात आलेल्या नसून मोठ्या पावसाने पाणी वाढल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण होऊन नदीची दिशा बदलल्यास या गोष्टीला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. तरी संबंधित विभागाने पाहणी करून होणारे नुकसान लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा होणाऱ्या परिणामास संबंधित विभाग जबाबदार राहणार आहे.
महादेव पाटेकर (सामाजिक कार्यकर्ते)
ढोरजळगांव येथील ढोरा नदीवरील बंधा-यावर टाकण्यात आलेल्या फळ्या पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटून गेले तरी काढण्यात आल्या नाहीत. संबंधित विभागाच्या या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन नदीची दिशा बदलली तर पाटेकर वस्तीवरील २०० ग्रामस्थांचे जीवन धोक्यात येणार असून मनुष्य पशू वित्तहानी झाल्यास गोष्टीला जबाबदार कोण, असा सूर ऐकण्यास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here