प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील विद्यार्थ्याने बारावीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी दहावीमध्ये 91 टक्के मार्क मिळाले. मात्र, बारावीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्यामुळे आज सकाळी विजय उर्फ महेश तुकाराम राऊत या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिणी तोरडमल या करत आहेत.