Crime : पैशाच्या वादातून लहान भावाची चाकूने भोसकून हत्या

0

जवाहरनगर भागातील घटनेने खळबळ

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
औरंगाबाद : घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये न दिल्याने मोठ्या भावाने वकील असलेल्या लहान भावाच्या छातीत सुरा भोसकून हत्या केल्याची खळबळ जनक घटना शुक्रवारी (दि.24) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील जवाहरनगर भागात घडली. हत्या केल्यानंतर मारेकरी भाऊ पसार झाला.

ऍड. सूर्यप्रताप ठाकूर वय-53 वर्ष (रा.परितोष विहार, जवाहरनगर) असे मृत वकिलांचे नाव आहे. तर वेद प्रकाश ठाकूर वय-56 (रा.पैठण) असे भावाची हत्या करून फरार झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. सूर्य प्रताप आणि वेद प्रकाश हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत वेद प्रकाश हा पैठण येथे राहतो तर मृत सूर्यप्रताप हे औरंगाबाद येथील जवाहर नगर या भागात राहतात ते एका कंपनीमध्ये लीगल ॲडव्हायझर म्हणून काम करतात. शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास मोठा भाऊ वेद प्रकाश हा पैठण येथून औरंगाबादला आला होता. दोघेही घरात बसले यावेळी वेदप्रकाश ने घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची आवश्यकता आहे मला दे, असे लहान भाऊ कडे पैशाची मागणी केली.

दरम्यान, चहासाठी घरातील दूध संपल्याने सूर्य प्रताप यांच्या पत्नी अशा ठाकूर या दूध आणण्याससाठी तिसऱ्या मजल्यावरील शेजाऱ्यांकडे गेली. दरम्यान, सूर्यप्रताप यांच्याकडे पैशे नसल्याने त्यांनी पैशे देण्यास नकार देतात. दोघांमध्ये वाद निर्माण झाला राग अनावर झाल्याने वेदप्रकाशने सूर्यप्रतापवर धारदार सुऱ्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडताच वेदप्रकाशने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे काढून घरातील भावाचे कपडे घालून घराची कडी लावून पसार झाला. काम करणाऱ्या बाईने वेदप्रकाशला पायरीवरून पळताना पाहिले. तिला संशय आल्याने अशा ठाकूर यांना सांगितले. दोघींनी घरात जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात सूर्यप्रताप जमिनीवर पडलेले होते त्यांना तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलीस मारेकरी भाऊचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here