प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
करजगांव: नेवासा तालुक्यातील करजगाव येथिल तामतळे वस्तीवरील एका 60 वर्षीय व्यक्तीचा खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने रूग्णाची संख्या दोन झाली. शुक्रवार दि.24/7/2020 रोजी सकाळी तहसिलदार रूपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सुर्यवंशी, सोनई प्राथमिक आरोग्य केद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कसबे यांनी भेट आढावा घेत जबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचा-यांना दिल्या.
या रूग्णाच्या संपर्कातील 21 व्यक्तीचा स्वॅब घेण्यासाठी नेवासे येथिल कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले. करजगाव येथील तामतळेवस्तीवर एक 60 वर्षीय व्यक्तीचा दहा दिवसापुर्वी मोटारसायकल घसरूण पडल्याने अपघात झाला होता. या व्यक्तीला राहुरी, विळदघाट व नंतर नगर येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होता.
यावेळी या रूग्णाची खाजगी हॉस्पिटलमध्ये केलेली कोरोनाची टेस्ट पॉझिटिव आली होती. या दरम्यान ही व्यक्ती घरी आल्याने भेटण्यासंदर्भात आलेल्या अनेक व्यक्तीच्या संपर्कात आली होती.
प्राथमिक आरोग्य केद्रांचे आरोग्य सेवक आर. आर. पोटोळे ,आरोग्य सेवक जनार्धन दिवटे,आरोग्य समुपदेशक आव्हाड,
मदतनिस मीना गायकवाड,आशा सेविका मीना झिंझार्डे , निकीता भोपळे यांनी संपुएर्ण वस्तीवरील लोकांच्या आरोग्याची विचारपुस करत महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी उपसरपंच अशोकराव टेमक, प्रशांत पुराणे उपस्थित होते.