प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर – ‘आठ’ दिवसांपासूनच्या सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर श्रीरामपूरात (बेलापूर) मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. केंद्र सरकारने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने मका हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले.
यामुळे जून महिन्यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्याची मका खरेदी केली जाणार आहे. बेलापूर केद्रांत २१८ शेतकर्यांची नोंदणी झालेली आहे. यामधील १३५ लाभार्थीच शेतकर्यांची मका खरेदी सुद्धा झालेली आहे. उरलेल्या ८३ शेतकऱ्याची मका खरेदी केली जाणार आहे. आता प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याने अडचणी सापडलेला शेतकरी सुखावला आहे. केंद्र सरकारने मका खरेदीला मुदतवाढ मिळाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मका खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्याचा व ‘माध्यम’ प्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच अखेर यश आले.
liquid tadalafil – tadalafil generic date buy tadalafil online safely