Ahmednagar Corona Updates : जिल्ह्यातील ४४ रुग्णांची कोरोनावर मात; तर नव्या ७० रुग्णांची भर

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर – जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३२७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २८५८ इतकी झाली आहे. आज ४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४८० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ०५, नेवासा तालुका ०२, राहाता ११, राहुरी ०७, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, नगर शहर ११, पाथर्डी ०१, शेवगाव ०१, भिंगार १०, कर्जत ०२, अकोले तालुका ०१, नांदेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १३२७*
*बरे झालेले रुग्ण: १४८०*
*मृत्यू: ५१*
*एकूण रुग्ण संख्या:२८५८*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here