Newasa : गर्दी करणा-यांनो, तुम्हाला कोरोनावर भरोसा नाही काय?

0

मुळाथडी परीसरात कायमचं गर्दी

प्रतिनिधी | बाळासाहेब नवगिरे | राष्ट्र सह्याद्री 
 
पानेगाव – कोरोनाच्या विषाणूने जग थांबले त्याचे लोण आता ग्रामीण भागात पोहचले असून वाड्यावस्तीत आता कोरोना पोहोचला असून ही ग्रामीण भागात जणू कोरोना काहीच होत नसून ही भावना ग्रामीण भागात चांगलीच रुजली असून जणू कोरोनावर तुमचा भरोसा नाही काय ? अशी म्हणण्याची वेळ मुळाथडी परीसरात आली आहे.

मागील महिन्यापूर्वी या परिसरातील राहुरी तालुक्यातील पाथरे येथे रुग्ण आढळला होता. त्या परिसरातील गावांनी चांगली काळजी घेऊन पुढे वाढणारी साखळी थांबवली होती. परंतु तो आनंद फार काळ टिकला नसून सोनईत मोठ्या प्रमाणात कोरोना शिरकाव झाला होता. तेथे पोलीस प्रशासनाने चांगल्याप्रकारे यशस्वीपणे लॉकडाऊन करुन सध्या तरी कोरोनाचा नवीन रुग्ण सोनईत नाही. नेवासे तालुक्यातील करजगाव येथे मुलाकडून वडिलांना कोरोनाची लागण तसेच याच गावातील वस्तीवरील दवाखान्यात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला एकाच गावात दोन कोरोना रुग्ण सापडले असून तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या काहींचे रिपोर्ट येणे बाकी आहे. एवढे सर्व असतानाही या परिसरातील गावांमध्ये मोठी गर्दी जमत असून सुरुवातीला प्रशासनाने काळजी घेतली तशी आज घेताना दिसत नाही.

चार ते पाच महिन्यांपासून प्रशासन काळजी घेत असून ते देखील आता थकल्यासारखे दिसत आहे. काहींना तर याबाबत गांभीर्य नसून टिंगलीवारी कोरोनाचा विषय चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना हा विषाणू लहान मुले वयोवृद्ध व्यक्तींना तसेच ज्या व्यक्तीला कायमस्वरूपी आजार आहे. यांना मोठा त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एवढे माहिती असूनही आपल्या घरच्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून आपण घरी थांबवून कामानिमित्त बाहेर पडले पाहिजे. असं प्रशासन सांगून ही कुठल्याच प्रकारचा परिणाम या भागात जाणवत नसून जणू कोरोनावर तुमचा भरोसा नाही का? म्हणण्याची वेळ आली. गावा गावात नेहमी मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here