पब्जी खेळताना युवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारापूर्वीच मृत्यू

    0

    प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

    पब्जी खेळत असताना एका 18 वर्षीय युवकाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. नांदेज जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी गावातील आहे. 

    राजेश नंदू राठोड (वय 18) असे या युवकाचे नाव आहे.

    राजेश हा मोबाईलवर पब्जी खेळत होता. हा गेम सुरू असतानाच राजेश याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

    पब्जी खेळामुळे यापूर्वीही अनेक युवकांचे मानसिक संतुलन ढासळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तर आता थेट मृत्यूची खबर आहे. अशा मोबाईल गेम्समुळे युवा वर्गाचे आरोग्य धोक्यात येत असेल तर यावर बंदी आणावी, अशी मागणी पालकवर्गातून होताना दिसत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here