आता आणखी लॉकडाऊन नको, अन्यथा उपासमारीने लोक मरतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विनंती… खुदा होऊ नका, आता आणखी लॉकडाऊन नको अन्यथ लोक उपासमारीने मरतील, असा विनंतीवजा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे कोरोनाने नाही, पण रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीने माणसं मरतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “आपण कोरोना मृत्यूदर आटोक्यात आणू” असं ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
उद्धव ठाकरे, विनंती… खुदा होऊ नका : प्रकाश आंबेडकर pic.twitter.com/KhrTQTZYvi
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2020
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. काहींनी योग्य मागणी म्हटले आहे. तर ठाकरे समर्थकांनी मात्र, वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे, फडणविसांनी लिहिलेली स्क्रिप्ट बोलत आहे, असे ट्विट केले आहे.