प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बॉलिवूडमध्ये माझ्या विरोधात गँग सक्रिय असून त्यामुळे मला काम मिळत नाहीए, असा खळबळ जनक आरोप जगप्रसिद्ध संगीतकार ए आर रहेमान याने केला आहे. रहेमानच्या या आरोपाने समस्त बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत रहेमान म्हणाला, मला असे वाटते, माझ्या विरोधात टोळी सक्रिय असून ती खूप अफवा पसरवत आहे. त्यामुळे मला काम मिळत नाही. वास्तविक मी कधीही चांगला चित्रपट नाकारत नाही. पण तरीही अशी काही टोळी आहे ज्यांना मला काम मिळू द्यायचे नाही.
सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा या चित्रपटासाठी मुकेश छाब्रा माझ्याकडे आले होते. त्यांनी मला माझ्याविषयी इंडस्ट्रित सुरू असलेल्या चर्चा सांगितल्या. वास्तविक मी मुकेश यांना फक्त दोनच दिवसात चार गाणी दिली.
सूशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहे. पण ए आर रहेमान सारखा संगीतकार जेव्हा असे म्हणतो तेव्हा याबाबत खूप गांभीर्याने विचार करणे भाग पडते.