Rahuri : महसूल विभागात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, एक अधिकारी बाधित

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
राहुरी तालुक्यात कोरोनाचे मीटर वाढतच असून ग्रामीण भागातून कोरोनाची पावले शहराकडे वळू लागलेली असताना शहराची संख्या ११ होताना कोरोनाचा महसूल विभागात पून्हा शिरकाव झाला आहे. महसूलचा एक अधिकारी आज रोजी बाधीत झाला आहे.

तर शहरातील दुसरा आणखी एक रुग्ण आधीच्या महसुलच्याच बाधीत रुग्णाच्या संपर्कातील असून ग्रामीणमधे वांबोरी व कात्रड येथे प्रत्येकी एक तसेच उंबरे येथे तीन रुग्ण आढळले आहे. आजच्या सकाळच्या सत्रात आढळलेले चारही रुग्ण क्वारंटाईन सेंटर येथे क्वारंटाईन होते आणि दुपारच्या ४.३० वाजेच्या आकडेवारीत उंबरे येथील तीन जणांचा खाजगीतील अहवाल पॉझिटिव्ह आहे, अशी माहिती तालुक्याच्या आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली आहे. आज दिवसभरात ७ रुग्णसंख्या झाली.

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना राहुरीत एकही रुग्ण सुरुवातीच्या कोरोना काळात संक्रमित नव्हता. मात्र, लॉकडाऊन नंतर अनलॉक झाल्यावर राहुरीत रुग्णसंख्या वाढत गेली. तालुक्याच्या रुग्णसंख्येने अर्धशतक पार करत आज रोजी रुग्णसंख्येत वाढ होत कोरोनाने पंचाहत्तरी गाठली आहे तर राहुरी शहराची संख्या ११ झाली आहे.

शहरी भागासह ग्रामीणमधे रुग्ण वाढू नये. याकरिता प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, तरीदेखील कोरोनामीटर वाढत असल्याचेच चित्र रोज समोर येत आहे. तर दुसरीकडे तालुक्यासाठी आज आनंदाचेही वृत्त असून आज २६ जुलै रोजी ११ रुग्ण बरे होवून घरी परतणार आहेत, अशी माहिती समजते.

कोरोनाचा शिरकाव हा बाहेरुन आलेल्या लोकांमुळे झाला असून बाहेरगावी जावून आलेल्यांनी खबरदारी घेत इतरांच्या संपर्कात न येता स्वतःला आयसोलेट होणे जरुरीचे आहे. अन्यथा रुग्णसंख्येत भर पडत तालुका शतकी रुग्णसंख्येकडे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही.

प्रशासनाच्या आवाहनानुसार जनतेने आवश्यक ती खबरदारी घेत नियमांची अंमलबजावणी करुन अनावश्यक रित्या फिरु नये. मास्क वापरणे वेळोवेळी हातधुणे, सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. दरम्यान, उपचार पूर्ण झालेली संख्या ३०, उपचार सुरु ४५ यात ८ जण खाजगीत तर ३७ रुग्ण शासकीयमधे उपचार घेत आहेत. राहुरी तालुक्याची दुपारपर्यंत क्वारंटाईन स्थिती ४० आहे. तर आज अखेर एकूण स्वॉब घेतलेले ३८५ पैकी निगेटीव्ह ३१९ पॉजिटिव्ह ३३ व ४३ अहवाल येणे बाकी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here