बेलवंडी पाठोपाठ तांदळी दुमाला येथील रुग्णाचा मृत्यू
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात मात्र आता कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.
त्यातच काल तालुक्यातील बेलवंडी येथील एका तीस वर्षीय तरुणाचा कोरोनाशी लढतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दि28 रोजी तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एका 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सदर व्यक्ती ही नगर येथे उपचार घेत होती. श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसात कोरोनाने दोन बळी घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णसंख्या142इतकी असून सध्या 50रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 92 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केलीआहे, अशी माहिती डॉ. नितीन खामकर यांनी दिली.