जिल्हाप्रमुख खांडेंच्या हस्ते 11 हजार मास्क वाटपाला प्रारंभ
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
बीड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 27) बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेमध्ये 11 हजार मास्क वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते झाला. तसेच श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे वृक्षारोपण करुन 5 हजार झाडे लावण्याच्या उपक्रमालाही प्रारंभ झाला. त्याच प्रमाणे बीड शहरातील विविध कंटेनमेंट झोनमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
याप्रसंगी बाळासाहेब आंबूरे, बाप्पासाहेब घुगे, संगीत ताई चव्हाण, नितीन धांडे, गोरख सिंघन, सुनील सुरवसे, मशरु पठाण, अरुण नाना डाके, नगरसेवक भीमराव वाघचौरे, शुभम धुत, रतन गुजर, अर्जुन नलावडे, युवासेनेचे राहुल साळुंके, राहुल फरताळे, दिलीप भोसले,संतोष घुमरे, बाबु करांडे, संदिप सोनवणे, विवेक जाधव, सह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. जनतेमध्ये कोरोना संबंधी जागृती करा असा संदेश मुख्यमंत्री ठाकरे दिला होता. त्यानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेला कोरोनापासून बचावासाठी तब्बल 11 हजार मास्कचे वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयनगर रोड येथे सोमवार दि. 27 रोजी सकाळी करण्यात आला. तसेच 100 लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त 5 हजार झाडे लावण्याचा संकल्प जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला होता. त्या उपक्रमाचा प्रारंभ श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे करण्यात आला. या ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन व्यवस्थितपणे करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली.
buy tadalafil online – buy tadalafil 20mg price tadalafil 10 mg