SSC Result : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30 टक्के, असा पहा निकाल

    0

    प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदाही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. तर बारावी प्रमाणेच दहावी निकालातही कोकण विभागच अग्रेसर राहिला आहे. विद्यार्थ्यांनी असा पहावा निकाल

    ‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार 

    www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे.

    निकाल कसा पाहाल ?

    💠निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

    💠त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

    💠त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

    💠त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

    💠यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

    💠निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

    एसएमएसवर निकाल

    बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल.

    विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

    ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध होईल.

    राज्याचा निकाल – 95.30%
    पुणे-97.34 %
    नागपूर 93.84 %
    औरंगाबाद -92 %
    मुंबई- 96.72 %
    कोल्हापूर-97.64 %
    अमरावती-95.14 %
    नाशिक- 93.73 %
    लातूर -93.09 %
    कोकण-98.77 %
    कोकण विभागाचा सर्वधिक निकाल तर सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here