लालपरीला व्हिटामिन ‘M’ ची गरज, 2000 कोटींच्या पॅकेजची मागणी

0

काय असेल ठाकरे सरकारचा निर्णय?

कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरी अर्थात एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. एस टी पुन्हा सुरु होण्यासाठी एस टी महामंडळाला मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज आहे.

एस टी महामंडळाकडे कर्मचा-यांचा जूनचा पगार करण्यासाठीही पैसे नाही, अशी माहिती अधिका-यांनी दिली असून राज्य सरकारकडे त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच एसटी जर पुन्हा सुरू करायची असेल तर आर्थिक पॅकेज मिळणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे 2000 कोटींच्या पॅकेजची मागणी महामंडळाने केली आहे.

आता ठाकरे सरकार लालपरीला हे व्हिटामिन ‘M’ पुरवते का याकडे लक्ष लागले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here