Shrigonda : पत्नीच्या विरहात गळफास घेऊन पतीची आत्महत्या

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी पत्नीचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात एक मध्यम वयस्क इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील बापू निवृत्ती बेल्हेकर (वय 55) त्यांचे त्यांच्या पत्नीवर अतोनात प्रेम होते 1 वर्षापूर्वी त्यांनी पत्नी मयत झाल्यापासून ते कायम टेन्शन खाली राहात असत. असे करता करता एक वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या पत्नीचे वर्षश्राद्ध आले. हिंदू रितरिवाजाप्रमाणे कार्यक्रम पार पडला.
मात्र, त्यावेळी बापू निवृत्ती बेलेकर यांना आपल्या पत्नीसोबत लाभलेल्या आठवणी दाटून येत होत्या. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात बापू निवृत्ती बेलेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तोरडमल या करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here