नेवासा तालूक्यातील एक पोलिस अधिकारी बनले कोरोना शिकार !

1

संदीप गाडेकर । राष्ट्र सह्याद्री

नेवासा: तालूक्यातील एका पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आसून ‘त्या’ कोरोना बाधित पोलिस अधिकाऱ्यांना पुढिल उपचारार्थ नेवासा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आसल्याची माहीती आरोग्य विभाग सुञांनी दिली.
नेवासा तालूक्यात एक वैद्यकिय अधिकारी,नगरसेविका आणि बुधवारी आलेल्या अहवालात तालूक्यातील एक पोलिस अधिकारी कोरोनाबाधित झाल्याचे उघड झालेले आहेत. जनतेचे रक्षण करणाऱ्या व आरोग्य संभाळणाऱ्या वैद्यकिय अधिकारीच कोरोनाची शिकार बनले गेल्याने आरोग्य व पोलिस खात्याच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोनई येथे पुन्हा एकदा एक कोरोना बाधित आढळला आहे .सोनईकरांची पुन्हा एकदा धाकधुक वाढली आहे. नेवासा तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.त्या पोलिस ठाण्याचे किती कर्मचारी या अधिकाऱयांच्या संपर्कात आलेले आहेत याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here