प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अकोले तालुक्यात आज एकाचवेळी बाधितांचा उच्चांक… सकाळीच आढळले तब्बल १४ कोरोना बाधित…
अकोले तालुक्याला हादरा देणारी घटना आज बुधवारी सकाळीच आली. तालुक्यातील माणिकाओझर येथे तब्बल १० तर राजुरला दोन, वाघापूर एक व निब्रळ एक अशा १४ जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे..!
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात सकाळीच तालुक्यातील माणिक ओझर येथील ४२,३४,३३,२२ वर्षीय पुरुष ६०,४८,३७ वर्षीय महिला व १४,०५,०१ वर्षीय लहान मुलांसह १० जण तर राजूर येथील ६० व ३० वर्षीय पुरुष, वाघापूर येथील ४५ पुरुष व तालुक्यात पुन्हा नविन गाव निब्रळ येथील २१ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यात रुग्णांची एकूण संंख्या ११० झाली आहे. त्यापैकी ६६ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर ४१ जणांवर उपचार सुरु आहे. अकोले करानो सावधान काळजी घ्या …!विनाकारण बाहेर फिरू नका…!घरी रहा… सुरक्षित रहा..!