Karjat : तालुक्यात कोरोनाचा उच्चांक, बुधवारी एकाच दिवसात तब्बल २४ रुग्ण आढळले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २९

कर्जत : कर्जत तालुक्यात बुधवारी कोरोनाबाधीत रुग्णाचा उच्चांक गाठत एकाच दिवशी तब्बल २४ व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे, अशी माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ८७ झाली आहे. यापैकी कर्जत शहर ९ तर ग्रामीण भागात ७८ रुग्णाची नोंद झाली आहे. 

कर्जत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून बुधवारी या संख्येने उच्चांक गाठत एकाच दिवशी तब्बल २४ व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १४ कोरोनाबाधित व्यक्ती राशीन येथे सापडले आहे. यानंतर कर्जत शहर ३, कापरेवाडी २, कुळधरण २, पिंपळवाडी २ आणि नागापूर १ येथील व्यक्तीचा समावेश आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या निकट संपर्कातील व्यक्तीची आरोग्य विभाग माहिती घेत असून तेथील परिसर प्रतिबंधित करण्याची सूत्रे प्रशासनाने हाती घेतली आहे. बुधवार दि २९ रोजी एकाच दिवशी २४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून कर्जत तालुक्यातील उंच्चाकी संख्या ठरली. आजमितीस कर्जत तालुक्याचा एक ही अहवाल प्रलंबित नसून ६० रुग्ण कोरोना ऍक्टिव्ह आहे. तर कर्जत तालुक्यातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णाची ८७ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here