प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराजांना अयोध्या येथे दि.५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी नियोजित मंदिराच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. यासाठी सोमवारी दि.३ ऑगस्टला ते अयोध्येला रवाना होणार आहे. श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या वतीने हे विशेष निमंत्रण गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना देण्यात आले आहे.
गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर श्रीराम जन्मभूमीच्या नियोजित मंदिराचा भूमिपूजन व न्यास पूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व देशातील प्रमुख संत महंतांच्या हस्ते हा सोहळा होत आहे. या कार्यक्रमासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या स्ट्रस्टच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना त्यांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे प्रमुख या नात्याने निमंत्रण देण्यात आलेले असल्याने भक्त परिवारातही उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातून श्रीराम जन्मभूमी न्यासाचे विश्वस्त मंडळाचे सदस्य असलेले महंत गोविंददेवगिरी महाराज व्यास यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना निमंत्रित करण्यात आले असल्याने महाराष्ट्रातील भक्त परिवारासह श्रीराम भक्तांकडून ही आनंद व्यक्त केला जात आहे. सोमवारी दि.३ ऑगस्ट रोजी गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे अयोध्येला रवाना होणार असून त्यांच्या समवेत विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री अॅड. सुनील चावरे हे देखील अयोध्येला रवाना होणार आहे.
dutasteride vs finasteride – http://finasteridepls.com/ is propecia expensive
cheap tadalafil – tadalafil canadian pharmacy buy generic tadalafil online