Shrigonda : साईकृपा फार्मसी येथे उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्री दत्तकृपा फाऊंडेशन संचलित साईकृपा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, घारगावमधील डी फार्मसी व बी फार्मसीचे सर्व विद्यार्थी उन्हाळी २०२० परीक्षेत चांगल्या गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले.

डी फार्मसी प्रथम वर्षांमध्ये MSBTE यांच्या अंतर्गत झालेल्या अंतिम  परीक्षेमध्ये  प्रथम क्रमांक रुपाली खरात, व्दितीय क्रमांक अश्विनी निंभोरे व प्राजक्ता बेंद्रे आणि प्रिती पोटघन, तृतीय क्रमांक सुकन्या बेंद्रे व रोहित पंधरकर यांनी पटकाविला.

तसेच बी फार्मसी व्दितीय सत्रामध्ये DBATU, लोणेरे  यांच्या अंतर्गत झालेल्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक रुपाली मोरे, व्दितीय क्रमांक प्रतिभा शिंदे व तृतीय क्रमांक किरण दंडे यांनी मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव अर्चना द. पानसरे, प्राचार्य डॉ. डी.जी.उमाळकर, रजिस्टार कल्याण शिंदे, वरिष्ठ लिपिक प्रमोद लगड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here