प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काष्टी तालुका यांच्या वतीने संस्थेमार्फत सभासद व कर्जदार यांचे अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. तसेच अपघात झालेल्या दोन कर्जदारांना रुग्णालयात उपचारानंतर विम्याची रकम देण्यात आली.

यावेळी संस्थेचे राजेंद्र दादा नागवडे व अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था उत्तम कामकाज करीत असून संस्थेकडे अकरा कोटींच्या ठेवू जमा झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात सन 2019 ते 20 मध्ये संस्थेस 15 लाख 63 हजार 24 रुपयांचा नफा झाला, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी अशोक रामचंद्र शिंदे (रा.मढेवडगाव), अनिल रामभाऊ लगड (रा. कोळगाव) यांना संस्थेचे संस्थापक दीपक शेठ नागवडे व चेअरमन आदेश नागवडे तसेच मॅनेजर संतोष दातीर आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकृत विमा सल्लागार सुनील कटारिया यांच्या हस्ते देण्यात आले आहे.