Shrirampur : शहरातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

0

सदर महिलेवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
श्रीरामपूर – शहरातील मोरगे वस्ती भागातील एका कोरोना ग्रस्त महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सदर ५० वर्षांची महिला आज सकाळी ७ च्या सुमारास लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना मयत झाली आहे.

या महिलेला पॅरालिसिस सदृश आजार होता. कोमात गेल्यावर ती त्यातून बाहेर आली होती. सुधारणा होत असताना अचानक तब्येत ढासळून दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. या मृत महिलेचे अंत्यसंस्कार नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस यांच्या उपस्थितीत करोना प्रोटोकॉल प्रमाणे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here