प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : सरहद या संस्थेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्वाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्र हा कायमच देशासाठी दिशादर्शक ठरला आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये जे भारतमातेचे अनेक सुपुत्र होते त्यात लाल-बाल आणि पाल यांची महत्त्वाची भूमिका होती. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारतीयांना एकसंध ठेवण्याची कामगिरी भारतीय राष्ट्रीय सभेने केली. याचं नाव नंतर राष्ट्रीय काँग्रेस म्हणून केला गेला.
दरम्यान शरद पवार यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. 1185 मध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुण्यात होणार होतं. आज जसं संपूर्ण जगात करोनाचं संकट आहे तसं ते अधिवेशन ठरलेलं असताना पुण्यात प्लेगचं संकट होते. त्यामुळे पुण्याऐवजी ते अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय घेतला गेला. ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणी हे अधिवेशन झाल.