प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौ-यावर होते. पुणे दौ-यावरून मुंबईला रवाना होताना गाडीत बसून शासकीय कार्यालयातून गाडी काढली. याचवेळी पत्रकार त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे आले. मात्र, ठाकरे यांनी सर्वांना स्टेअरिंग वरिल हात सोडून नमस्कार केला. हे पाहून सगळे अवाक झाले.
सध्या राज्याचे स्टेअरिंग नेमके कुणाच्या हातात यावरून मोठी खमंग चर्चा रंगलीय. खासदार राऊत यांना मुलाखतीत राज्याचे स्टिअरिंग आपल्याच हातात आहे. असे सांगतिले होते. तर यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवशी अजित पवारांनी ठाकरेंसह गाडी चालवत असतानाचा फोटो ट्विट केला.
त्यामुळे राज्याचे स्टेअरिंग हे आपल्या हातात असल्याचे अजित पवार यांनी सुचित केले असल्याची चर्चा सुरू होती. विरोधक आधीच राज्यात तीन मुख्यमंत्री असल्याची टिका करीत होते या फोटोमुळे त्यांना आयतेच कोलीत मिळाले. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी आता कळले असेल आम्हाला काय म्हणायचे होते, असा टोला लगावला.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी तो फोटो 6 महिन्यापूर्वीचा आहे. सध्या सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असा खुलासा केला. तर यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी यावर स्टेअरिंग कोणाच्याही हातात असो, गाडी कुठे न्यायची हे पाठीमागे रिक्षात बसलेला ठरवतो, असा टोला लगावला.
या पार्श्वभूमीवर आज स्वतःच गाडी चालवत पुणे दौ-यावर आलेले ठाकरे यांनी जेव्हा स्टेअरिंग वरून हात उचलत नमस्कार केले. तेव्हा सगळे अवाक झाले. यावेळी टिपलेल्या या फोटोची खूप चर्चा होत आहे.