प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी श्रीगोंदा शहरात घडली.

आताच निकाल लागलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी श्रीगोंदा शहरातील एका मुलीने खूप मेहनत घेतली. त्या मेहनतीचे चीज देखील झाले, असे म्हणावे लागेल. मात्र काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तिला 87 टक्के एवढे चांगले गुण देखील मिळाले. पण त्या मुलीला यापेक्षा जास्त गुण अपेक्षित होते. मात्र अपेक्षित असणारे गुण न मिळाल्यामुळे ती नाराज झाली. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यातून तिने गळफास घेऊन स्वतःला संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना आज दुपारी श्रीगोंदा शहरात घडली आहे.
शहरातील एका नामांकित विद्यालयात शिकणारी ही विद्यार्थिनी होती. एवढे चांगले गुण मिळूनही या विद्यार्थिनीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.