प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
यंदाचे पावसाळी अधिवेशन विधानभवना बाहेर मंडप टाकून होणार असल्याची शक्यता आहे. विधीमंडळा बाहेर वॉटरप्रूफ एसी मंडप उभारला आहे. असे झाले तर विधान भवनाबाहेर घेण्यात येणारे हे इतिहासातील पहिलेच अधिवेशन ठरेल.

यासंबंधीचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. नुकताच यासंबंधी अध्यक्ष नाना पाटोळे यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या प्रस्तावात विधान परिषदेचे कामकाज शारीरिक अंतर राखून करता येऊ शकते. मात्र विधानसभेसाठी विधीमंडळा बाहेर मंडप उभारून घेण्यात यावे. त्यासाठी वॉटरप्रूफ, एसी मंडप उभारावा असे सांगण्यात आले आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 7 ऑगस्टला होणार आहे. त्यात अधिवेशनाच्या आयोजनाची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यात मोकळ्या जागेत अधिवेशन आयोजित करण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल.