Newasa : मुळाकाठ परिसरातील ओढे-नाल्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

करजगांव – मुळाकाठ परिसरात दररोज होणा-या पावसामुळे तसेच राहुरी व नगर तालुक्यात होणा-या पावसाच्या पाण्यामुळे नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील शिरेगांव, खेडले-परमानंद, करजगाव, पानेगाव येथील ओढे नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.

आज सकाळीही मोठ्या प्रमाणात ओढ्यावरून वेगाणे पाणी वाहत होते. यामुळे यावरून प्रवास करणे अनेकांनी टाळले. मात्र, अत्यावश्यक कामासाठी जाणा-यांना स्थानिक तरूणांनी मदत करत दुचाक्या काढण्यास मदत करत आहे.
माझे सोनईला दुकान आहे. गेल्या तीन दिवसापासून ओढ्यावरून पाणी वाहत आहे. आज, मात्र ओढ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वेगाने वाहत आहे. यामुळे सोनईला जाणे टाळले.
 – रवि होन (शिरेगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here