सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर – चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामात खोडा घालण्यासाठी मिस्टर गायब लोकप्रतिनिधी परतले असून प्रशासकीय कामात ढवळाढवळ करण्याचा यांचा हेतू शुद्ध आहे की त्यांच्या इतिहासासारखा अशुद्ध आहे ? हे तपासायला हवे अशी खरमरीत प्रतिक्रिया भैया भिसे यांनी दिली आहे.
Redmi 9 Power (Electric Green, 4GB RAM, 64GB Storage) - 6000mAh Battery | 48MP Quad Camera | Extra INR 1000 Amazon Pay Cashback
₹ 10,999.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)TIITAN 64GB MicroSDXC UHS 3 100MB/s Memory Card + SD Adapter
₹ 490.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भिसे यांनी म्हटले आहे की, देशात कोरोनाचे संकट वाढत असताना श्रीरामपूर तालुक्यात आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून महसूल, पोलीस प्रशासन कोरोना संक्रमण वाढू नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असो चोवीस तास पोलीस जनतेची काळजी घेत आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या भागात पोलीस चौकी उभारण्याचे चांगले काम पोलीस उपविभागीय अधिकारी मदने साहेब व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब यांनी केले आहे. त्यामुळे पोलिसांना संपूर्ण तालुक्यावर कंट्रोल करणे सोपे होणार आहे.
मात्र, कोणतेही काम न करता फक्त पेपरबाजी करणाऱ्या मिस्टर गायब लोकप्रतिनिधीला चांगल्या कामाचा झटका आलेला दिसतोय. त्यामुळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बिनबुडाच्या तक्रारी करण्याचा डाव हा लोकप्रतिनिधी आखत आहे.
पढेगावच्या पोलीस चौकीचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला तर यांच्या पोटात दुखायचे कारण काय ? वर्षभरात एकही रुपयाचे नवीन काम न करणारा लोकप्रतिनिधी कोरोना संकटात पोलीस चौकीसाठी निधी देणार कधी ? चौकी बांधणार कधी ? याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याचे जगजाहीर असल्याने लोकवर्गणीतून चौकी बांधल्यास यांना दुखायचे कारण काय ?
राज्य शासनाने दिलेला कोरोना लढ्यातील निधी यांनी कुठे वापरला ? चांगले अधिकारी बदनाम करून मर्जीतील अधिकारी आणून इतिहासात केलेले घोटाळे करायचे का ? जेव्हा पोलीस उपाशी राहून कोरोना संकटात काम करत होते तेव्हा हे महाशय झोपले होते का ? वर्षभरात श्रीरामपूरला खड्ड्यात घालणारे मिस्टर गायब टायगर नाही तर लबाड लांडगे असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधी फक्त चांगले काम बंद पाडण्याचे काम करत आहे……