एका नव-याच्या दोन बायका असलेलं सरकार; राम शिंदे यांचे टीकास्त्र

  0

  सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान राम शिंदे यांची खरमरीत टीका

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  हे सरकार म्हणजे एका नव-याच्या दोन बायका आणि त्यामुळे अडचणीत आलेला संसार, अशी बोचरी टीका भाजपचे नेते राम शिंदे यांनी दूध आंदोलनावेळी केली. 

  सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आले. यावेळी राम शिंदे म्हणाले, सरकारचे कान उघडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. कोरनामुळे जनता त्रस्त झाली आहे. मात्र, सत्तेत आल्यापासून या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. घरातील कर्ता माणूस घरी बसलाय. त्यामुळे सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.

  हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही” असा आरोप राम शिंदे यांनी केला.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here