प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
पुण्यातील महाविद्यालयांनी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. फक्त गुणपत्रिकेच्या आधारावर प्रवेश घेता येऊ शकते, इतर कागदपत्रांची प्रवेश घेतावेळी सक्ती नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशि प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे (FYJC Online Admission).
शुल्क भरून फॉर्म ब्लॉक करणे आवश्यक आहे. तसेच अर्जातील माहीती शाळा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेणे. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहीती भाग-1 ऑनलाईन तपासून प्रमाणित व्हेरिफाईड करून घ्यावा.