Shirurkasar : सर्वसामांन्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिका-यांची यापुढे गय करणार नाही – आमदार क्षीरसागर

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिरूरकासार – कोरोनाचे संकट आपल्यावर घोंगावत असून सर्वसामान्यांची कामे तात्काळ होणे गरजेचे आहे. सर्व  अधिका-यांनी याची जान ठेवून कामात दिरंगाई करू नये, दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाही, असा ईशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिरूरकासार येथे (दि.31) शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत बोलताना दिला.

तहसिल कार्यालयाच्या सभागृहात दुपारनंतर या बैठकीला सुरुवात झाली. व्यासपीठावर त्यांच्यासह तहसीलदार श्रीराम बेंडे, गटविकास अधिकारी राजेश बागडे, माजी जि. प. सदस्य मदन जाधव, पं. स. सदस्य माऊली सानप यांची उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, गेली पाच महिन्यांपासून कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पु:न्हा विस्कळीत झाले आहे. आर्थिक व्यवस्थाही हालाखीची झाली. कसाबसा शेतकरी जीवन जगत असताना पिक कर्जाचे बाबतीत1800 कोटीचे टार्गेट पूर्ण झाले असल्याचे काही बँका सांगत आहेत. तो अधिकार यांना दिला कुणी? या बाबतीत वरिष्ठांना बोलणार आहे. गरिबांच्या राशनमध्ये काळाबाजार करणाऱ्यांची गय नाही. वेळप्रसंगी मी अचानक भेटी देणार असल्याचे सांगून हातावर पोट भरणाऱ्या मजुरांबाबतीत काही करता येईल का याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.

बेबाकी प्रमापत्रासाठी स्टेट बँक जास्त पैशे घेत असल्याचे उघकीस आले असून या बाबतीत लिड बँकेकडे तक्रार करणार आहे. मागील पिक विम्यापासून जिल्ह्यातील काही मंडळे वगळण्यात आल्याने या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असून यापुढे अतिवृष्टी किंवा वक्रदृष्टी निर्माण झाली. तर अधिकारी यांनी लोकप्रतिनिधीनींना विचारात घेऊनच पंचनामे करायला आम्ही आता भाग पाडू, असे सांगून कोरोना सध्या ग्रामीण भागात वाढत चालला असून या संकटात तालुका प्रशासनातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांची कामे तात्काळ करावीत जर झाली नाहीत. तर मी यापुढे गय करणार नाही, असा गर्भित ईशाराही शेवटी बोलताना क्षीरसागर यांनी दिला. यावेळी सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here