Ahmednagar : जनतेशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी फेसबुकवर लाईव्ह

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जनतेशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उद्या रविवारी (दि.2) सकाळी अकरा वाजता फेसबुक लाईव्हवर येणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर (@InfoAhmednagar) या फेसबुक पेजवर ‘लाईव्ह’ असणार आहेत.  

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या मनातही काही प्रश्न असतील तर त्या थेट आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधत मांडता येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात घेतलेले विविध निर्णय, रुग्णांची गैरसोय टळावी यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून तालुकापातळीवर केलेले नियोजन आदी बाबींवर ते संवाद साधणार आहेत. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी नागरिकांशी संवाद साधतील. जिल्हयातील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवून त्यांना असणार्‍या शंका, प्रश्न यांची उत्तरे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्याशी थेट संवाद साधून निराकरण करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here