प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे भारतातील उपेक्षित समाजाचा दीपस्तंभ असल्याचे गौरवोद्गार नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी काढले.
जयंतीदिनाचे औचित्य साधून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. नेवासा तालुक्यातील नवीन चांदगाव येथील जगदंबा सार्वजनिक वाचनालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे होते.
यावेळी उपस्थितांसमोर अण्णाभाऊंचे जीवनकार्य विषद करताना माळवदे म्हणाले की, अंधारात चाचपडणाऱ्या भारतातील उपेक्षित समाजाला अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्य, पोवाड्यांतून प्रकाशाकडे नेले. अवघ्या दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ आजही उच्चशिक्षित तरुणांचे प्रेरणास्रोत आहेत.
याप्रसंगी काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव, तालुका सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, सरपंच देविदास उंदरे, उपसरपंच कैलास पिटेकर, अरुण जाधव, शिवाजी उंदरे, रघुनाथ दहिफळे, अर्जुन उंदरे, संतोष थोरात, प्रतीक पवार आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ सोशल डिस्टनसिंगचे पालन करून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश गायकवाड यांनी केले तर तालुका उपाध्यक्ष सुनील भोगे यांनी शेवटी आभार मानले.