मी कृषिमंत्री असताना शेतक-यांना युरियाची कमी पडू दिली नाही – एकनाथ खडसे

    0

    “साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

    मी कृषी मंत्री असताना शेतक-यांना युरियाची कमी पडू दिली नाही, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले, अशा शद्बत खडसे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

    “शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅकने घेण्याची वेळ आली आहे. ज्यादा दराने घ्यावे लागत आहे, पण तेही मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी कृषिमंत्री असताना अशी वेळ शेतकऱ्यांवर कधीही येऊ दिली नाही” असे खडसे म्हणाले.

    “सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

    शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा वेळोवेळी व्हावा, अशी मागणी करताना सरकारचे यावर नियंत्रण राहिलेले नसल्याचा घणाघातही एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीस सरकारच्या काळात ऑक्टोबर 2014  ते जून 2016 या दीड वर्षाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here