Shrigonda : पाझर तलावाला पडले भगदाड; तरुणांच्या प्रसंगावधानमुळे टळला मोठा अनर्थ…

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील पाझर तलाव क्र.१ च्या भरावाला दि.१ ऑगस्ट सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोठे भगदाड पडून पाझर तलावातील पाणी वाहून गेले. मात्र, परिसरातील तरुणांनी प्रसंगावधान राखून फुटलेला भराव बुझविल्याने मोठा अनर्थ टळला.
पिसोर खांड येथील पाझर तलाव क्र.१ चे काम नालाबंडींगच्या माध्यमातून झाले होते. ४ महिन्यापूर्वी या तलावाच्या दुरुस्तीचे ६ लाख रुपयांचे काम लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले होते. मात्र, या भागात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने तलावाच्या भरावावर ताण येऊन शनिवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोठे भगदाड पडून तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वायाला गेले.
परिसरातील तरुणांना भराव फुटल्याची माहिती होताच तरुणांनी प्रसंगावधान राखून फुटलेल्या भरावावर जेसिबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती व मुरूम टाकून भराव बुजविल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा भरावा खालील शेत जमिनी उभ्या पिका सहवाहून गेल्या असत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here