Ahmadnagar : जिल्ह्यात वाढले ३४ नवे रुग्ण, आज १२३ रुग्णांना डिस्चार्ज

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर : जिल्ह्यात काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७०२ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०५, पाथर्डी ०२, नगर ग्रामीण ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि कोपरगाव येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील १० रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले.
दरम्यान, आज एकूण १२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा ५२, संगमनेर ०२, राहाता ०५,पाथर्डी १४, नगर ग्रा. ०७, श्रीरामपूर ०५, नेवासा ११, श्रीगोंदा १०, पारनेर ०३, राहुरी ०१,शेवगाव ०१, कोपरगाव ०८, जामखेड ०३, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: ३७६२*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: १७०२*
*मृत्यू: ७८*
*एकूण रूग्ण संख्या: ५५४२*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here