Jamkhed Breaking : कुसडगाव येथे विहिरीत महिलेसह तीन मुलींचा मृतदेह आढळला

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एक महिला व तीन मुलींचा विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. अद्याप कारण मात्र समजू शकले नाही.

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील भोगलवाडी शिवारात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका महिलेसग तिच्या तीन मुलींचा मृतदेह विहीरीतील पाण्यात आढळून आला. मात्र, घटना नेमकी कशा मुळे घडली हे अद्याप समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच कुसडगाव येथील सरपंच हवा सरनोबत, पोलीस पाटील निलेश वाघ माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ही घटना तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना सांगितली. यानंतर त्या दोघांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. एक तासानंतर चारही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरी बाहेर काढले. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आईसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मयतांची नावे समजली असून स्वाती राम कार्ले वय ३० -आई, कोमल राम कार्ले वय ६ -मुलगी, सायली राम कार्ले वय ९ -मुलगी, अंजली राम कार्ले वय ११ -मुलगी याप्रमाणे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here