Pathardi : तालुक्यातील खरवंडी कासार येथे सशस्त्र दरोडा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

खरवंडी कासार येथील पोलीस दूरक्षेञ एक पोलीस उपनिरीक्षक व चार काॅन्स्टेंबल यांची नेमणूक करावी- ग्रामस्थांची मागणी

खरवंडी कासार येथे शनिवारी (दि.1) राञी पांडुरंग तानाजी केळगेंद्रे यांच्या घरी चोरट्यांनी शशस्ञ दरोडा टाकत घरातील एक तोळ्याचे मिनी गंठण, तीन तोळे वजनाची साखळीची पोत, कानातील कर्णफुले इत्यादी सोने व एक लाख पंच्याऐंशी हजार रोख रक्कम असा दोन लाख चौसष्ठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

भगवानगड परिसरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे खरवंडी कासार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच अहमदनगर पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पाथर्डी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस काॅन्स्टेंबल संदीप गर्ज यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करुन श्वानपथक सहाय्याने चोरट्यांच्या पाऊलखुनाचा मागोवा घेतला. चोरटे खरवंडी कासार स्वामी समर्थ मंदीर ते मीडसांगवी अशा मार्ग पळून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

शनिवारी रात्री एकच्या सुमारास पांडुरंग केळगेंद्रे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत राहत्या घरी गाढ झोपेत असताना पाच चोरटे कटरच्या सहायाने दरवाजा तोडून घरात घुसले. चोरट्यांनी घराच्या दरवाजावर दगड मारले असता आरडाओरडा झाला. घरातील लोक जागे झाल्याने पांडुरंग केळगेंद्रे यांच्या घराला कडी लावुन सुन वंदना केळगेंद्रे यांच्या रुमचा कटरने दरवाजा तोडून घरात घुसले. वंदना केळगेंद्रे यांनी चोरट्यांना पाहताच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु लहान मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने वंदना केळगेंद्रे यांनी भीतीपोटी आरोपी चोरट्यांनी सत्तुर, तलवार, कटरचा धाक दाखवून वंदना केळगेंद्रे यांच्या अंगावरील दागिने बळजबरीने चोरुन घेतले. घरातील कपाटाचे दार कटरच्या सहाय्याने तोडून रोख रक्कम चोरुन घेऊन गेले. शिवाय घरासमोरील मोटरसायकलचे दगड मारुन नुकसान केले आहे. या जबरी चोरीमुळे फिर्यादी पांडुरंग केळगेंद्रे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात भादवी कलम नुसार ३९५ ,३९७ ,४२७ , गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.

खरवंडी कासार परीसरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरवंडी कासारमधून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने महामार्गावर राञी जबरी चोरी, दरोडे इ घटना घटत आहेत. भगवानगडावर संत भगवानबाबा यांच्या ऐतिहासिक पुरातुन वास्तुपैंकी रायफल तलवार चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.

अद्याप चोरीचा तपास लागला नाही. त्यातच खरवंडी कासार व परीसरात चोरट्यांनी शशस्ञ दरोडा टाकत दहशत निर्माण केली आहे. खरवंडी कासार येथील पोलीस दुरक्षेञ एक पोलीस उपनिरीक्षक व चार काॅन्स्टेंबल यांची नेमणूक करुन कायमस्वरूपी सुरु ठेवावे. अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here