Rahuri : डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील व व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांचे राजीनामे

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

डॉ.तनपुरे कारखाना चेअरमन उदयसिंह पाटील व व्हा. चेअरमन शामराव निमसे यांनी सोमवारी सकाळी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामे दिले.

राहुरी कारखाना निवडणुकीनंतर चेअरमन पदी उदयसिंह पाटील तर व्हा.चेअरमन पदी शामराव निमसे यांच्या निवडीवर माजी मंञी राधाकृष्ण विखे पा., खा. सुजय विखे पा. यांनी शिक्का मोर्तब केला होता. चार वर्ष कालावधीत त्यांनी पदभार सांभाळला. परंतू काही दिवसापूर्वीच विखे यांनी यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.

डॉ. तनपुरे कारखान्याच्या चेअरमनपदी विखे यांच्या नातेवाईकांची वर्णी लावण्यासाठी पाटील निमसे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले असल्याची चर्चा चालू आहे. उंबरे येथील संचालकाची चेअरमन पदी वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here