Sangamner : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आठशे पार…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | विकास वाव्हळ

कोरोना संगमनेरकरांची पाठ सोडायला तयार नाही. आज सकाळी 5 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर काल सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन चाचण्यामधून 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून संगमनेर तालुक्याची एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 808 वर जाऊन पोहोचली आहे.

आज सकाळी खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर शहरातील अभिनवनगरमध्ये एका 67 वर्षीय व्यक्तीचा तर तालुक्यातील घुलेवाडी येथील 51 व 52 वर्षीय व्यक्ती, कनोली 1व जवळे कडलग येथील 1 अशा एकूण 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.

दरम्यान, काल प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमधून शहरातील संजय गांधीनगर परिसरातून 20 वर्षीय महिले, 8 वर्षीय बालिका, नेहरू चौक परिसरातील 66 वर्षीय व्यक्ती, चंदनापुरी मधील 65 वर्षीय महिला, घुलेवाडी 70 वर्षीय पुरुष,29 वर्षीय महिला व 24 व 20 वर्षीय तरुण, बोट्यातील 34 वर्षीय तरुण, खराडीतून 70 वर्षीय वयोवृद्ध , 40 वर्षीय तरुण व 11 वर्षीय लहान मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आहे.काल दुपार पर्यंत 12 रात्री 12 व आज सकाळी 5 अशी एकूण 29 रुग्णांची भर पडल्याने  संगमनेर तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने आठशेचा टप्पा गाठून वर  808 जाऊन पोहचली आहे.

दिलासादायक
दरम्यान, आज कोरोनावर 55 रुग्णांनी यशस्वी रित्या मात करून दिलासादायक दिला आहे. तालुक्यात एका बाजूला पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असली तरी कोरोनावर यशस्वी रित्यामात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. त्यामुळे संगमनेरकरांना मोठ्या प्रमाणात धीर ही मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here