Shrigonda : भानगाव बीटमध्ये दारू व गुटख्याचा महापूर; पोलिसाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्रीगोंदा तालुक्यात याचा काहीही एक फरक पडलेला दिसून येत नाही. लॉकडाऊनचा फायदा घेत जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ग्रामीण भागात अवैध गावठी दारु धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील डोंगर वाड्या वस्तीत व आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळली जाते. लॉक डाउनमुळे सर्वत्र दारू बंदी असल्याने रोज पिणाऱ्या तळीरामांचा मोर्चा हा गावठी दारू कडे वळला असून तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध गावठी दारूवाले, गुटखा विक्री् तसेच सुट्टे ड्रम मधून पेट्रोल, असे अनेक बेकायदेशीर व्यवसाय भानगाव बीट मध्ये खुलेआम चालू असून याबाबत पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे. याबाबत पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
गावठी दारुची आतिशय घातक असून सुरूवातीला अवैध दारू तयार करण्यासाठी नवसागर काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र, सध्या दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. तसेच गावठी दारू तयार केल्यानंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक बनत आहेत. त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वनसपंदा अडचणीत येत आहे. त्यामुळे वनविभागानेही आता अवैध दारू करणाऱ्यांविरोधात पुढे येणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू विरोधात केसेस केल्या जात असल्या तरी अवैध दारूची निर्मिती बंद झालेली नाही. दोघांच्याही कारवाईचा तुलनात्मक अभ्यास केला तर दारूच्या भट्यांवर कारवाईपेक्षा अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत अशी अवैध दारू निर्मितीची केंद्र उद्ध्वस्त होणार नाही. तोवर हा प्रश्न कायमचा सुटणार नाही, असे मत सामान्य लोक व्यक्त करत आहेत.

साहेब आमच्या गावातील गुटखा बंद करा – गृहिणी
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जात आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला अनेकदा माहिती दिली. पण दुकानदार आम्ही पोलिसांना हप्ते देतो. आमचे कोणीच काही करू शकत नाही, असे म्हणतो. यामुळे आमचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. तरी गावातील गुटखा बंद करा, अशी मागणी नाव न घेण्याच्या अटीवर एका महिलेने दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here